बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : राज्यस्तरावरून बीड जिल्ह्याला लसीचा पुरवठा अंत्यत अल्प प्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनापुढे लसीकरण करताना अनेक अडचणी येत आहेत. या आडचणी लक्षात घेवूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी खालच्या यंत्रणेला एक महत्वाचा आदेश काढला आहे. अंबाजागाईतील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण सुरू ठेवावे, उपकेंद्रासह अन्य ठिकाणचे लसीकरण करू नसे असे त्यांनी आपल्या या आदेशात म्हटले आहे.
27 एप्रिल रोजी राज्यस्तरावरुन झालेल्या व्ही.सी.तील सुचना उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, कोविड -19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. अपेक्षित उद्दिष्टानुसार कोविड लसीचा पुरवठा राज्य स्तरावरुन अत्यल्प प्रमाणात होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय अडचण निर्माण होत आहे. परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, जिल्हा रुग्णालय बीड, उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय, प्रा.आ.केंद्र इ.ठिकाणीच सध्यस्थितीत कोविड लसीकरण सत्र राबविण्यात यावेत, उपकेंद्रं अथवा अन्यत्र लसीकरण राबविण्यात येउ नये, याबाबत आपल्या स्तरावर संबधितांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय, वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केद्रं नागरी, शहरी यांना केले आहे.