बीड

लसीकरण आणि कोविड रूग्णांच्या प्रभावी उपचाराची राज्यात अंमलबजावणी व्हावी, पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्या दहा सूचना

मुंबई ।दिनांक २७।
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रूग्ण व निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून कोविड लसीकरण मोहिम आणि रूग्णांच्या प्रभावी उपचार अंमलबजावणीसाठी दहा सूचना केल्या आहेत.

राज्यात १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचा लसीकरण कार्यक्रमात वयाची अट नसावी कारण प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुरक्षित करण्याचा अधिकार आहे, असे सांगत लसीकरणासाठी पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या सूचना अशा –
लसीकरण कार्यक्रमाची माहिती गावागावामध्ये देण्यासाठी सरकारी यंत्रणे एवढी दुसरी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसते त्यामुळे या यंत्रणेचा उपयोग करावा, आरोग्य विभागाच्या समवेत ग्रामविकास खात्याच्या ग्रामपंचायत, महसुल विभागाच्या तलाठी आणि नगरविकास विभागाच्या वॉर्ड कार्यालयापासुन ते आयुक्त कार्यालयापर्यंत सर्व यंत्रणा या कार्यक्रमात सज्ज कराव्यात, लसीकरणाचे केंद्र हे जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून गर्दी कमीत कमी होईल. नाहीतर एकाच केंद्रावर जास्त गर्दी होऊन संसर्ग वाढू शकतो,खासगी डॉक्टर्सना सुध्दा लसीकरणा संदर्भात अधिकार आणि पुरवठा केला तर अधिक सोयीचे होईल,
लसीकरणासाठी ज्यांचा दुसरा डोस आहे आणि जे वयस्कर आहेत, ते आणि पहिल्या डोसचे नागरीक एकत्र केले तर गोंधळ उडेल त्यामुळे पहिला व दुसरा डोस घेणार्‍यांसाठी स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे, जे नागरीक कोविड पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांना लक्षणे नाहीत त्या नागरीकांना गावागावामध्ये आयसोलेशनच्या संदर्भात निर्णय घेणे जास्त सोयीचे ठरेल. बर्‍याच सामाजिक संस्था, राजकीय नेते आपापल्या परीने आयसोलेशन सेंटर, रुग्णांच्या खाण्या पिण्याची सोय, औषधांची व्यवस्था करत आहेत पण सरकारी यंत्रणा गावागावात पोहोचलेली व प्रशिक्षित असते त्यामुळे सरकारी यंत्रणेने हा निर्णय घेणे संयुक्तिक ठरेल, मागच्या वेळी मजूरांना आपण ज्यावेळी गावी पोहोचवले होते त्यावेळी गावातच त्यांना आयसोलेशन केलं होतं. तसं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी किंवा शाळा ज्या आता बंद आहेत त्या ठिकाणी जर आयसोलेशन केंद्र केलं तर घरातील एखादा व्यक्ती पॉझिटीव्ह असला तरी बाकीच्यांना संसर्ग होण्यापासून वाचवता येईल,गावात आयसोलेशन सेंटर झाले तर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून त्यांना मॉनिटर करणे शक्य होईल त्यांची जेवणाची जरी सोय झाली तरी या आयसोलेशन सेंटरमुळे गावागावात वाढत असलेला प्रादुर्भाव कमी होईल, फिरत्या कोविड चाचणीची व्यवस्था आणि रॅडम चेकिंग व्हावी,
कोविड मुक्त व शंभर टक्के लसीकरण गाव व मंडळ अथवा वॉर्ड करणार्‍या लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गासाठी विशेष सन्मान जाहीर करावा व त्यांना 15 ऑगस्ट रोजी पुरस्कृत करावे अशा सूचना पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रात केल्या आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!