बीड

रेमडीसीवर मिळणार तालुकास्तरावर; दहा तहसीलमध्ये केली जाणार नोंदणी

बीड, दि.25 (लोकाशा न्यूज) : तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील खाजगी कोविंड हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांना जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमडीसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली असल्यास आता तहसील कार्यालय स्तरावर त्यांची यादी करून मेलवर मुख्य कार्यालयास पाठवन्यात येणार आहे, त्यानंतर संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिटेंडेंट हे इंजेक्शनचा पुरवठा करणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना बीड मुख्यालय येऊन आयटीआय येथे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडू नये यासाठी ना निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जिल्हयातील अकरा तहसील पैकी दहा तहसील कार्यालयात नोंदणी करून इंजेवशन मिळवता येणार आहे, तर बीड तालुक्याची नोंदणी आयटीआय येथेच होणार आहे.

इंजेक्शन वाटपाची दक्षता घ्या
बीड जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा होईल त्यानुसार तो एजन्सीकडून उपलब्ध करून घेऊन अनुक्रमे आपले नोंदणी प्रमाणे प्रत्येक रुग्णास एक याप्रमाणे त्यांचे रुग्णालयास वाटप करण्याची दक्षता घ्यावी असे आदेश उपजिल्हाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी सर्व तहसीलदार यांना दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!