मुंबई । दिनांक १६।
“राज्याच्या भल्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन. त्याची दखलही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा,” असा टोला भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी लगावला आहे.
बीडमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. यावरुन पंकजाताई मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते त्यावर पालकमंत्र्यांच्या ट्विटवर ट्विट करून त्यांनी पलटवार केला आहे.
“राज्याच्या भल्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पवार साहेबांनाही पत्र लिहीन, दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असं ट्वीट पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
••••