बीड

जिरेवाडी ते बार्शी रोड या बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या 18 कोटीच्या कामाला मंजुरी, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश


बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातून धुळे-सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. शहरातील या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा खा.शरदचंद्रजी पवार साहेब, ना.अजित दादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, ना.जयंत पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड बायपास टु बायपास या बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या 18 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया करून काम सुरू केले जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाराष्ट्र डिव्हीजनचे संतोष बाजपाई यांनी या बीड शहरातील बायपास अंतर्गत रस्त्याच्या 12 कि.मी. कामाला 18 कोटी रूपये मंजूर केल्या बाबतचे पत्र नागपुर आणि औरंगाबाद डिव्हीजनला प्राप्त झाले आहे. लवकरच सदर प्रश्न मार्गी लागणार असल्याने आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्नांना मोठे यश आले आले आहे.
बीड शहरातून धुळे-सोलापूर हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्याला 12 कि.मी.चा बाह्य वळण रस्ता करण्यात आला. या बायपासमुळे शहरातील मुळ रस्त्याकडे महामार्गाच्या अधिकार्‍यांचे, यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. या रस्त्याला नाल्या, त्याचे उतार, त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रकल्प संचालक यांच्यापासून नागपुर, मुंबई आणि दिल्लीपर्यंत पत्र व्यवहार करत खा.शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, ना.जयंत पाटील, ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून थेट केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून बायपास टू बायपास या बीड शहरातील रस्त्याच्या कामासाठी आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 18 कोटी रूपये मंजूर झाले असून लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील मुख्य रस्त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहेत. सदर प्रश्न मार्गी लागला असल्याने शहरातील नागरिकांच्या आ.संदिप क्षीरसागर, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले जात आहेत.

चौकट
शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीतही पाठपुरावा
बीड शहरातील बाह्य वळण रस्त्याअंतर्गत 12 कि.मी.चा रस्ता खराब झाल्याने रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप क्षीरसागर, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून मुंबई मंत्रालय ते दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत पोहचले. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून दिल्लीतही सदर कामाचा पाठपुरावा करून पवार साहेबांच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आ.संदिप क्षीरसागरांची दिल्लीवारी बीडकरांच्या फायद्याची ठरली आहे.

सिमेंट, डांबरी रस्त्यासह सुशोभीकरण होणार
बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या कामास मंजूरी मिळाली असून बायपास अंतर्गत असलेला हा रस्ता काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी डांबरी होणार असून आवश्यक त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि पथ दिवे देखिल बसवले जाणार आहेत. गेल्या 2 वर्षापासून सदर प्रश्न प्रलंबित होता. आता लवकरच बीड शहरातील रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटला जाईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!