बीड । दिनांक ३०।
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांचे आज खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान देहावसान झाले. आज संत तुकाराम महाराजांची बीज, आजच्या दिवशी लक्ष्मण महाराजांचे देहावसान होणे हा योगायोग स्मरणात राहील. महाराजांच्या जाण्याचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले असून जिल्हयाच्या आध्यात्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
••••