सावता परिषदेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन
बीड, दि.27 (लोकाशा न्यूज) क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरून महापुरूषांची बदनामी करणा-या लोकसेवा अॕकडमीचा शिकवणी शिक्षक आप्पा हातनुरे याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निवेदन सावता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना देण्यात आले आहे.
सदाशिव पेठ पुणे येथील लोकसेवा अॕकडमी चार शिकवणी शिक्षक आप्पा हातनुरे यांनी आपल्या युटुब वर शिकवणी करतांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरून महापुरूषांची बदनामी केली आहे.या घटनेचा सावता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.राज्यात ठिकठिकाणी संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या अॕकडमीवर बंदी घालुन त्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.बीड येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात महापुरूषांची बदनामी ही दुर्दैवाची बाब आहे.आशा माथेफिरू व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे.जेणेकरून कोणत्याच महापुरूषांची बदनामी होता कामा नये.या अॕकडमीवर बंदी घालुन शिक्षक हातनुरे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी नसता सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सावता परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, मराठवाडा संपर्कप्रमुख विष्णु खेञे, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा संघटक अर्जुन शिंदे, युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामराजे राऊत,बीड तालुकाध्यक्ष सुधीर चौधरी, बीड शहराध्यक्ष संग्राम शिंदे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.