बीड- जिल्ह्यात होणाऱ्या covid-19 प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली आली यावेळी धुलीवंदनानंतर संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे व्यापारी, कामगार, मजूर आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला आहे मात्र या लॉक डाऊन च्या काळात केवळ दोन तासाचा अवधी हा व्यापाऱ्यासाठी पुरेसा नाही यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी वेळेत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह व्यापारी संघटनेचे दीपक कर्नावट, सूर्यकांत महाजन,अशोक शेटे, जवाहर कांक्रिया,प्रकाश कानगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली यावेळी शहरातील व्यापार्यांच्या दृष्टीने नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी संचार बंदी च्या कालावधीत शिथीलता द्यावी जेणेकरून बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना, दूध विक्रेत्यांना भाजीपाला व फळ विक्रेत्यांना दिलासा मिळेल प्रशासनाने नियमानुसार कडक निर्णय घ्यायलाच हवेत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनतेने देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे लागू करण्यात आलेले नियम हे योग्यच आहे मात्र संचारबंदी च्या कालावधीत दोन तास हे पुरेसे नाहीत त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीने हा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे व्यापार्यांच्या दृष्टीने सहानुभूती पूर्वक विचार करून प्रशासनाच्या वतीने धुलीवंदनाच्या नंतर वेळेत शिथीलता देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.