बीड राजकारण

भाजपने लढाई पूर्वीच हत्यार टाकले ? ; डिसीसीत धनंजय मुंडेंच्या व्युव्हरचनेसमोर भाजप निष्प्रभ?

लोकाशा
ना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात डिसीसी साठी जोरदार फिल्डिंग असल्याचे दिसून येत असताना विरोधी चमूत देखील यावर मोठा परिणाम दिसून येत असल्याची बातमी आहे , मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत थेट माघार घेतली जात असल्याची सूत्र कळवीले आहे, जर बहिष्कार टाकायचा होता तर उमेदवारी अर्ज का भरले असा सवाल करताना ऐन लढाईच्या एक दिवस अगोदर हत्यार म्यान करण्याची पद्धत माघार दर्शवते . यामुळे धनंजय मुंडे गटाचा प्रभाव वाढला असून भाजपच्या राजकीय क्षमता आणि वजनात यामुळे हानी दिसणार आहे . भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासी मोठा खल झाला माजी मंत्री पंकजा मुंडे आ. सुरेश धस यांच्या उपस्थितीत निवडणूक लढवण्या बद्दल विस्तृत चर्चा झाली मात्र फारसे होप्स दिसले नसावेत अन धनंजय मुंडे जिल्ह्यात तळ ठोकून असताना भाजप मात्र शांत होते अध्यक्ष सारडा सारखे मुरब्बी निवडणुकीतून माघारी फिरले हा धनंजय यांचा मोठा प्रभाव होता, अमरसिंह पंडित आ. संदीप क्षीरसागर आ. प्रकाश सोळणके सह सेना काँग्रेस ला सोबत घेऊन डीएमने जोरदार बांधणी केली या च वेळी भाजपचे नेतृत्व बीड व निवडणुकीपासून दूर राहिले याचाच प्रत्यय म्हणजे आजची माघार आहे का अशी चर्चा होत आहे .बदाम राव पंडित यांनी माघार घेतली अशोक लोढा यांना जयदत्त क्षीरसागर यांनी विरोध केला , पंडित यांनी निवडणुकीत अर्थ राहिला नसल्याचे सांगत माघार घेतली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!