बीड

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, गुरूवारी सापडले 185 रुग्ण पॉझिटिव्ह

बीड, जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा आपले पाय मुळे पसरण्यास सुरूवात केली आहे. काल आरोग्य विभागाने 1407 संशयीतांच्या कोरोना टेस्ट केल्या. यामध्ये तब्बल 185 जण बाधीत आढळून आले. यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड तालुक्यातील असून ते तब्बल 185 आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा धोका वाढला असून नागरिकांनी विनामास्क घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जगताप यांनी सर्व व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. त्याला व्यापारी हवा तसा प्रतिसाद देत नाही. काल दिवसभर झालेल्या तपासण्या 9 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर आज दुपारी 1407 संशयीतांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले यामध्ये 185 जण पॉझिटिव्ह तर 1222 जण निगेटिव्ह आढळून आले आहे. पॉझिटिवमध्ये अंबाजोगाई 42, आष्टी 16, बीड 85, धारूर 1, गेवराई 12, केज 7, माजलगाव 13, परळी 5, वडवणी 3 तर शिरूर तालुक्यात 1 रूग्ण आढळून आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!