बीड

बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची दमदार ओपनींग, जिल्हाध्यक्ष सचिन मूळूक यांनी करिष्मा दाखवला

बीड
दि.१८ : ५ वर्षानंतर शिवसेनेने बीड जिल्ह्यातील ६ तालुक्यात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली दमदार ओपनींग केले आहे. केज तालुक्यातील ३ ग्रामपंचायती एकहाती ताब्यात असून सहा तालुक्यामध्ये २१ ग्रामपंचायतीमध्ये ३४ सदस्य विजयी होऊन शिवसेना सत्तेत सहभागी होईल झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या कार्यक्षेत्रातील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. यापैकी केज तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या सहकार्याने बोबडेवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, कोरडेवाडी ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. तसेच, शिवसेनेचे ३४ पेक्षा जास्त २१ ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत सहभागी झाले आहेत. हे शिवसेनेचे अनपेक्षित यश जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या कार्यकाळात मिळाल्याची नोंद कायम राहणार आहे. दरम्यान, गत पाच वर्षात शिवसेनेचे सदस्य नव्हते. आता सदस्यांसह ग्रामपंचायती ताब्यात घेत शिवसेनेने दमदार ओपनींग केलं आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी, शिवसैनिकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!