मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.