बीड

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; जिल्हाधिकार्‍यांनी काढले हे आदेश

पक्षाची खरेदी विक्री, वाहतूक, बाजार बंद

बीड, दि.11 (लोकाशा न्युज)ः पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे सोमवारी अहवालातून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील बर्ड फ्ल्युचा शिरकाव होताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुगगाव गाव शिवारापासून दहा कि.मी. त्रिजेतील परिसरात अंतापूर, वहाली, चिखली, निवडूंगा, सुप्पा-सावरगांव, भुरेवाडी, वसंतवाडी व आष्टीताील ब्रम्हगाव पांगुळ गव्हाण या गावातील कुक्कडपक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा यासह प्रतिबंध केला आहे. यासंदर्भात सोमवारी त्यांनी आदेश जारी केला असून वरील सर्व गावे हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!