महाराष्ट्र

शेतकऱ्यांची चिंता वाढली, मध्य महाराष्ट्रात 6, 7 जानेवारीला पावसाची शक्यता


मुंबई : मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. थंडीची चाहूल लागतात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत अधिक गारवा निर्माण झाला आहे. पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला पावसाची शक्यता आहे.

वातावरणातील बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होईल अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात 6 आणि 7 जानेवारीला रिमझिम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर राज्यात काही ठिकाणी ढगाळ तर विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत 19 ते 21 अंश सेल्सियस तापमान असून येत्या आठवड्यात दोन ते तीन डिग्रीनं आणखीन खाली उतरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!