cricket

पांड्या-शिखर धवनच्या ‘त्या’ भागीदारीने केला अनोखा विक्रम

मुंबई, दि. २८ (लोकाशा न्यूज) : तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न व्यर्थच ठरले.
हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करत भारतीय संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. या भागीदारीदरम्यान एक अनोखा विक्रमही घडला. हार्दिक आणि शिखर दोघेही आतापर्यंत एकत्र ३८ वन-डे सामने खेळले आहेत. परंतू दोघांनीही एकत्र फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

error: Content is protected !!