बीड दि.25 : मावेजा प्रकरणी पाटबंधारे कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचा जिल्हा रूग्णालयात मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार दिल्यानंतर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पाटबंधारे कार्यकारी अभियंता, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मावेजासाठी पाली येथील शेतकरी अर्जून कुंडलिकराव साळुंके हा पाटबंधारे विभाग कार्यालयाचे उंबरे झिजविले असतांनाही न्याय मिळत नसल्याने कार्यालयात आत्मदहनाचा इशारा देत नैराश्यतुन कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. यात ते 90 टक्के भाजल्याने मंगळवारी रात्री उपचार दरम्यान निधन झाले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर पोलीसानी जाळून घेतलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पाटबंधारे कार्यकारी अभियंता, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.