बीड, दि. 23 ऑक्टोबर : करोनाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालय बीड येथीेल रक्तपेढी अंतर्गत होत असलेले रक्तदान शिबीरांची व रक्तदातांची संख्या कमी झालेलीआहे, तसेच जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमधील रक्त पिशव्यांची व रक्त घटकांची मागणी लक्षात घेता रक्त व रक्त घटकांच्या पिशव्यांचा साठा कमी आहे. थेलेसिमिया, रक्तक्षय, हेमोफिलिया प्रसूती नंतर होणारा रक्तस्त्राव, अपघातामधील गंभीर झालेल इ. रुग्णांना रक्त व रक्त घटकांची तात्काळ आवश्यकता असते त्याची पूर्तता उपलब्ध साठ्यामधून करणे आवश्यक असते. परंतू जिल्हा रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, बीड येथे रक्त पिशवी व रक्त घटकांची कमतरता असले कारणाने रुग्णांना रक्त व रक्त घटकांची पुरवठा करण्यामध्ये अनंत अडचणी निर्माण होत आहेत. तरी सर्व जनतेस जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांचे मार्फत आवाहन करण्यात येते की, स्वयं स्फूर्तीने जिल्हा रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, बीड येथे रक्तदान करुन तसेच राज्य रक्तसंक्रमण परिषदे यांच्या कोवीड 19 च्या अनुषंगाने आलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.