बीड

अंबाजोगाईतील ‘कोवीड केअर सेंटरला’ तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्या – खा. प्रीतमताई, केंद्राचा चार कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्या सुचना


बीड, दि. 7 : सध्या कोरोनाने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. गावागावात कोरोना पसरला आहे. हे सगळं चित्र लक्षात घेवूनच खा. प्रीतमताई ह्या एका वादळाप्रमाणे काम करत आहेत, जिल्ह्यावासियांच्या प्रत्येक संकटात त्या धावून जात आहेत. एका बाजूने जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे तर दुसर्‍या बाजूने याला रोखण्यासाठी कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत आहे. हा प्रश्‍न अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयाच्या प्रशासनाने खा. प्रीतमताईंच्या कानावर घातला, याची खा. प्रीतमताईंनी तात्काळ दखल घेतली आणि त्याअनुषंगानेच एक पत्र जिल्हाधिकार्‍यांना पाठवून ‘एनआरएचएम’मधून अंबाजोगाईतील कोवीड केअर सेंटरला तात्काळ मनूष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सुचना खा. मुंडेंनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे आरोग्य सेवेला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याला तब्बल चार कोटींचा निधी केंद्राकडून मिळालेला आहे, याची आठवण करून देत तो निधी सदर मनुष्यबळावर खर्च करावा, अशाही सुचना खा.प्रीतमताईंनी दिल्या आहेत.
सध्यस्थितीमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र सदरील उपाय-योजना कोवीडचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता कमी पडत आहेत. केंद्र सरकारकडून प्राप्त कोवीड निधीमध्ये चार कोटी रूपयांची तरतूद ही आरोग्य सेवा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत आहे, जी बीड जिल्ह्याला मिळालेली आहे, मेडीकल कॉलेजचे काम उत्तम पाहता त्यांना याबाबत तातडीची मदत पोचवणे जेणे करून त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक रूग्णांची योग्य सेवा घडू शकेल, तरी जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोवीड निधीतून सदरील संस्थेस ‘एनआरएचएम’ या कार्यक्रमांतर्गत आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे , अशा सुचना खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिल्या आहेत. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्याकिय महाविद्यालयाचे अधिष्ठतांनी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात खा. प्रीतमताईंना एक पत्र दिले होते, अंबाजोगाईतील कोवीड केअर सेंटरसाठी ‘एनआरएचएममधून मनुष्यबळ (285) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्राव्दारे खा. प्रीतमताईंना करण्यात आली होती, त्या 285 जागांमध्ये अधिपरिचारीका 100, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10, डाटा एंट्री ऑपरेटर 10, औषध निर्माता 5, क्ष-किरणतंत्रज्ञ 5, ई.सी.जी.तंत्रज्ञ 5, वार्डबॉय 100, भिषक 5, भुलतज्ञ 5, वैद्यकिय अधिकारी 10, बेड साईड अस्सिटंडच्या 30 जागांचा समावेश आहे. अधिष्ठतांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेवून खा. प्रीतमताईंनी यासंदर्भात एक पत्र पाठवून अंबाजोगाईच्या कोवीड केअर सेंटरला तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सदर प्रश्‍न नक्कीच मार्गी लावतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!