बीड

जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा लवकरात लवकर तयार करावा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सुचना


बीड, दि. 30 : जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार केला जावा यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्यात यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृती आराखडा याबाबत बैठक श्री रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते, जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, क्रॉप पॅटर्न तयार करताना सदर गावांमध्ये होणारे कृषी उत्पादन त्यांचे प्रकार एकूण उत्पादन हंगामनिहाय घेण्यात येणारे पीक पद्धती यांची माहिती असावी जिल्ह्यातील हा क्रॉप पॅटर्न तयार झाल्यानंतर याचा उपयोग शेतकर्‍यांना आणि आणि कृषीमाल खरेदी करणार्‍या कृषी आधारित उद्योगांना होईल आवश्यक दर्जा आणि होणारे पीक उत्पादन याची माहिती मिळाल्यामुळे कृषी मालाला अधिक दर मिळू लागेल या क्रॉप पॅटर्न ची माहिती वेबसाईट द्वारे आणि पुस्तिके द्वारे उपलब्ध करून देता येईल. ते म्हणाले सेंद्रिय शेती कडे वाटचाल करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात यावे यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्याची परिणामकारकता तपासली जावी याचा उपयोग सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी गटांना देण्यात येणारा प्रशिक्षण दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येईल करता येईल या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ क्लिप्स तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुलभ व सोपे करण्याचा प्रयत्न केला जावा असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले. याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डी.जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीमध्ये जिल्ह्यातील कृषी विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या बाबत चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्या साठी मोठी संधी असून याचा उपयोग शेतकरी गटांना मोठ्या प्रमाणात मिळू शकेल यासाठी प्राधान्यक्रमाने जिल्ह्यातील कृषी उत्पादनाचा विचार करता सोयाबीन , सिताफळ व पेरू या वर प्रक्रिया करणार्‍या या उद्योगात बाबत माहिती जिल्हा मार्फत राज्य कृषी आयुक्तालय आणि केंद्र सरकारकडे सादर केली जाणार आहे. तसेच यावेळी आत्माच्या वतीने शेतकर्‍यांसाठी आयोजित करण्यात येणारे उपक्रम प्रशिक्षणे योजनांची अंमलबजावणी आदींची माहिती सादर करण्यात आली. पन्नास शेतकर्‍याचा गट निर्माण करून या गटाद्वारे निवड झालेल्या शेतकर्‍यांच्या कडून वापर करत असलेल्या रासायनिक खत व निविष्ठांच्या उपयोगित शेतीचे रूपांतर टप्प्याटप्प्याने तीन वर्षानंतर पूर्ण पर्यंत पणे ऑरगॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये होण्यास मदत होते यासाठी शासनाच्या योजनेतून विविध प्रकारचे अर्थसाहाय्य तज्ञाद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यातील शेतीमध्ये कुशल शेतमजूर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचा देखील कार्यक्रम आत्मा च्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असून यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 660 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे दुसर्‍या टप्प्यात सध्या चालू असलेल्या प्रशिक्षणात 30 सप्टेंबर पर्यंत अजून 550 व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाईल यामुळे शेतीसाठी देखील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे अशी माहिती श्री मुळे यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!