बीड

म्हणूनच खत विकण्याऐवजी उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलात- साक्षी हांगे

बीड, दि. ३० (लोकाशा न्यूज) :- घामाच्या बदल्यात योग्य दामाची अपेक्षा असणाऱ्या ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांना न्याय मिळावा म्हणून शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटना आज न्यायासाठी रस्त्यावर उतरली आहे. गेल्या वर्षी मेळावा व यंदा कालपरवा मांजरसूंबा येथे घेण्यात आलेल्या बैठकीने ऊसतोड कामगारांच्या जिव्हाळयाबाबत खोटे प्रेम दाखवणाऱ्यांच्या पोटात जळजळ होऊ लागल्याचे दिसते आहे. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्यावर टीका करताना रक्तातील जिव्हाळ्याचा उल्लेख केला मात्र ज्यांनी हे म्हंटले आहे ते रक्तातील जिव्हाळ्यामुळेच १० बाय १० च्या खोलीमध्ये खत विकणारे उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहेत, मात्र तुमच्या रक्तामध्ये अशी गद्दारी होती हे आम्हाला माहित नव्हते. खत विकताना खताचे केमिकल बहुतेक रक्तात मिसळून विष झाले आहे. म्हणूनच असे विषारी फुत्कार बापावरच सोडले जातात, जशी गद्दारी तुमच्या रक्तात आहे तशी गद्दारी आमच्या रक्तात नाही असे शिवसंग्राम महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे यांनी म्हंटले आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलाला ऊसतोड कामगारच ठेवण्याचे धोरण कुणी आखले आहे हे आता सर्वांना कळले आहे. आ विनायक मेटे यांची प्रामाणिक भावना होती कि बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने असणाऱ्या ऊसतोड कामगार, मुकादम समाजाला त्यांच्या घामाचे रास्त दाम मिळावेत. जो लवाद स्व गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात ३ वर्षांचा होता तो लवाद ५ वर्षांच्या बंद दाराआड कामगार अन मुकादमांना विश्वासात न घेता कुणी केला? चार पैसे ऊसतोड कामगार अन मुकादमांना त्यांच्या मेहनतीच्या हिशोबाने मिळावेत यासाठी आपल्या नेतृत्वाने काय दिवे लावले? कामगार, मुकादमांच्या मुलांमुलींच्या शिक्षणासाठी कधी जिव्हाळ्याने प्रयत्न केले आहेत का? जसे भटक्या विमुक्त समाजासाठी निवासी शाळा असतात तशी एखादी तरी निवासी शाळा आपल्या नेतृत्वाने उभारली आहे का? त्या उभारतील तरी कशासाठी? कारण त्यांना राजकारण करण्यासाठी हे पोरं कामगार करायचे आहत जेणेकरून त्यांचा राजकीय स्वार्थ साधला जाईल. कामगार, मुकादम, वाहतूकदारांच्या सुरक्षिततेचा कशी विचार केला आहे का? गेल्या वेळेस ऊसतोड कामगार जिल्ह्यात परतत असताना कोरोनामुळे गावाकडे येण्यासाठी किती हाल झाले तेव्हा तुम्ही कुठे होतात? माणुसकीला काळिमा फासेल असे हाल ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांचे झाले होते तेव्हा कुठे तुमचा जिव्हाळा गेला होता? असा प्रश्न साक्षीताई हांगे यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक कारखान्याला कोरोनाकाळात ऊसतोड कामगारांची कारखाना परिसरात सोय करण्यात यावी, त्यांना बीडमध्ये पोहोचण्यात मदत करावी यासाठी सर्वांशी संपर्क आ विनायक मेटे यांनी केला होता. ऊसतोड कामगारांना क्वारंटाईन करण्यासंदर्भात अन त्यांना बीड जिल्ह्यातील प्रवेशाबाबत १७ एप्रिल २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी संपर्क करून याबाबतचा पाठपुरावा आ विनायक मेटे यांनी केला होता, सकाळी बोलणे झाल्यानंतर सायं ४:३० वाजता स्वगृही परतण्याचा मार्ग शासनाकडून उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून मुख्य सचिवांनी पत्र काढत खुला केला. ह्या बाबी सातत्याने गद्दारी करणाऱ्यांना काय माहित असणार? यापूर्वी आमच्याशी गद्दारी करून मुंडे साहेबांचे पाय धरले होते, त्यानंतर त्यांच्याशी गद्दारी केली, आता पुन्हा आमच्याशी गद्दारी करून तिकडे गेले अन यापुढेही त्यांच्याशी गद्दारी केली जाईल. तुमच्यासारख्या गद्दारांना प्रत्येकवेळी गद्दारीची सवयच लागली आहे. गद्दार मानसिकतेची ज्यांची बुद्धी स्वार्थाने हपापलेली आहे अशांना या बाबींचा जिव्हाळा कुठे असणार? रक्तातच गद्दारी असणाऱ्यांना संपूर्ण जिल्हा गद्दार म्हणून ओळखतो, ज्या ताटात खायचे त्याच ताटात छेद करायचे अशी मानसिकता ठेवणाऱ्यांना किती किंमत समाजात राहिलेय? हा खरा संशोधनाचा विषय आहे. ऊसतोड कामगारांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता याचा आपण कधी विचार केला आहे. उसाच्या फडात महिला अन मुलामुलांच्या आरोग्याबाबत महिला म्हणून कधी भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या नेत्याला कनवळा आला का? असे अनेक प्रश्न आहेत. मंत्री असताना, सत्ता असताना स्व गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने असलेल्या महामंडळासाठी काय केले? ज्याने आ विनायक मेटे यांच्या नावाने जिव्हाळा विचारला त्यांना महामंडळाचे नियम माहित आहेत का? त्याची कार्यपद्धती माहित आहे का? गद्दार मानसिकतेमुळे हांजीहांजी करण्याची सवयच लागलेल्यांना उसाच्या पाचटात अख्ख आयुष्य घालणाऱ्यांचे दुःख काय कळणार. मुंबईचा मुक्काम सांगणाऱ्याला अमेरिकेचा खलिता नीट कळतो. मग बीड दूर कि अमेरिका? कोरोनाच्या नावाखाली बीडला सुद्धा येत नाहीत ते नेते आहेत का? वेळ खर्ची घातला असता तर मनातले नव्हे तर प्रत्यक्षातले मुख्यमंत्री झाले असते, आतासारखी घरी बसायची वेळ आली नसती. हे आपल्या नेत्यालाच वापस सांगून ऊसतोड कामगार, मुकादमांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगावे. ऊसतोड कामगारांचा लवाद हा कामगाराची बाजू घेत नाही तर कामगाराच्या नावावर कारखान्याची बाजू घेत आहे. कामगारांच्या प्रश्‍नावर बोलण्यापेक्षा कारखान्याच्या प्रश्‍नावर बोलणारे इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. फक्त आणि फक्त स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत होते. आता मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली देत कामगारांकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने आता स्वत: गोपीनाथराव मुंडे व्हावं, अन् अन्यायाविरूद्ध उभं राहावं असे आवाहन आ विनायक मेटे यांनी केल्याने संपूर्ण राज्यात ऊसतोड कामगारांच्या नावाने फक्त आणि फक्त राजकारण करणाऱ्यांच्या पोटात दुखायला लागले आहे.


परदेशी मुक्कामी असणाऱ्यांना उसाच्या फडातले दुःख काय कळणार

आ विनायक मेटे हे मुंबई मुक्कामी असल्याचे सांगत आरोप करणाऱ्यांच्या नेत्या ह्या परदेशात आहेत. त्या तेथून सर्व व्यवस्थित लक्ष ठेऊन असल्याचा गवगवा गद्दार मानसिकतेचे स्वार्थाने हपापलेले बीडमधून करतात. मात्र परदेशातून उसाच्या फडात जे दुःख ऊसतोड कामगार, मुकादमाना सहन करावे लागते याची कल्पना अन जिव्हाळा हा ऑनलाईन वेब कॅमेऱ्यातून कसा कळणार? ५ वर्षात साधे महामंडळ मूर्त स्वरूपात आणू शकले नाहीत त्यांनी तरी काम विधान परिषदेत प्रत्येक अधिवेशनामध्ये या महामंडळाबद्दल आवाज उठवणाऱ्या आ विनायक मेटे यांच्याबद्दल बोलू नये. आ विनायक मेटे हे जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा बीडमध्येच असतात याची माहितीत गद्दारांनी आवर्जून ठेवावी तसेच आपल्या भूगोलाचा चांगला अभ्यास करून बीड ते मुंबई अन बीड ते अमेरिका हे अंतर किती आहे हे पाहावे. इतकाच जिव्हाळा होता तर कोरोनाच्या भीतीने बीडला न येणाऱ्या मात्र कोरोनाच्याच सावटात असणाऱ्या अमेरिकेला आपला नेत्या कशा जातात हा प्रश्नही विचारून घ्यावा. ज्या गद्दारांना व्यक्तिगत स्वार्थासाठी चाटूगिरी कुणाचे काय काय चाटायचे आहे हे जरुर चाटावे मात्र आपल्या आवाक्याच्या बाहेर असणारे व ज्यातील अक्कल नाही अशा विषयांमध्ये अक्कल पाजळु नये. ऊसतोड कामगारांचा विषय हा वाळू अन छावणीमध्ये पैसे खाण्यासारखा नाही, येथे संघर्ष करावा लागतो घामाच्या दामासाठी, असा टोला शिवसंग्राम महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे यांनी लगावला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!