महाराष्ट्र

महाराष्ट्राचे अजून एक मंत्री कोरोनाच्या विळख्यात


मुंबई, दि. २९ (लोकाशा न्यूज) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार”.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!