महाराष्ट्र

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या


पुणे, दि. 28 सप्टेेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत या निवडणुका पुढे ढकल्या आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क मधील तरतुदीप्रमाणे राज्य शासनाला नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार असतो.<लीया तरतुदीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने जगभर पसरलेला करोनाला साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. दिवसेंदिवस राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य होणार नाही. राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती विचारात घेता सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयीचे आदेश सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी दिले आहेत. यापूर्वी 18 मार्च 2020 व दि.17 जून 2020 अशी दोनदा निवडणुक पुढलण्यासंदर्भातील आदेश काढण्यात आला होता. राज्यातील 31 पैकी 22 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर 21 हजार 225 प्राथमिक कृषि सहकारी संस्थांपैकी 8 हजार 194 संस्था आदींसह सुमारे 30 हजार संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!