बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात सध्या सौर पंप बसवण्याचे काम विद्युत मंडळाकडून चालू आहे, यासंदर्भात संबंधित गुत्तेदार शेतकर्यांना वाळू, सिमेंट वाहतूक या सबबीखाली पैसे मागत आहे, मात्र असे कोणी पैसे मागितल्यास विद्युत मंडळाच्या या अधिकार्यांना फोन करा (दांगट सहाय्यक अभियंता फोन नंबर 7875762252), हिप्परगी उपकार्यकारी अभियंता (7875000376), (कंट्रोल रूम 7875176464) असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. असे जर कोणाला आढळून आले तर जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करा, सदरील कंपनीने सब लेट करून काही केदार नेमले आहेत ते शेतकर्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे सदर प्रकार उघडकीस येणे अत्यंत आवश्यक आहे.