मराठवाड्यातील कोविड परिस्थिती संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन चर्चेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाच्या मागण्या आग्रहाने मांडल्या . झालेल्या बैठकीत सहभागी होऊन बीड जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवडा, रेमडीसिवर इंजेक्शन मुबलक पुरवठा व इतर प्रश्नांकडे मा. मुख्यमंत्रांचे लक्ष वेधले असे ना धनंजय मुंडे यांनी केलेल्या पोष्ट मध्ये म्हटले आहे . जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रशासन कटीबद्ध असल्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .