महाराष्ट्र राजकारण

‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील शरद पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

​मुंबई: केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं मांडली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे.  या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरोधी’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. 

राज्यसभेत कृषी विधेयकं सादर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी अनुउपस्थित होते. यावरुन  महाविकास आघाडी सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना ‘जाणता राजा’ म्हणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील शरद पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी सुरक्षित असल्याचं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला, असं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच  ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है…’ असं  संभ्रमात टाकणारं विधान नितेश राणे यांनी केल्यानं सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!