मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालला आहे. त्यात सर्वसामान्यांपासून ते राजकारणी लोकांनाही याचा विळखा बसताना दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याविषयी वर्षा गायकवाड़ यांनीच ट्विट करून माहिती दिली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘आज माझ्या तपासणी दरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.