बीड, दि. 20 : ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटेपर्यंत कोयता म्यान राहील, अशी ठाम भूमिका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतुकदार संघटनेने घेतली आहे. ऊसतोड मजूर नेत्या पंकजाताई मुंडे यांनी कोयता म्यान करण्याचे आदेश दिल्याचेही या संघटनेने बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कोयता हातात घेऊन ऊसतोड मजूर रस्त्यावर येईल. संप फोडण्याचा प्रयत्न केला तर संघटना आक्रमक होईल. तसंच हातात कोयते घेऊन हिंसक नक्षलवादाच्या गनिमीकावा प्रमाणे सरकारला व कारखानदाराला सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी सरकारला दिला. तसंच, ’काही साखर कारखाने ऊसतोड मजूर संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनादेखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कार्याध्यक्ष तात्यासाहेब हुले यांनी सुनावलं. ’ऊसतोड मजूर कोयता बंद आंदोलनाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची घोषणा करत पंकजाताई मुंडे यांनी कोयता म्यान करण्याचा आदेश दिला असून आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली संप कोयता बंद तीव्र करणार आहोत. जोपर्यंत ऊसतोड मजुरांच्या पदरात काही पडत नाही तसेच त्यांच्या मुलांच्या शाळांचा प्रश्न दीडशे पट भाववाढ मुकादम यांचा कमिशनचा प्रश्न महिलांच्या आरोग्याचा प्रश्न व संदर्भात कारखान्यावर ती सुसज्ज हॉस्पिटल होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील सात लाख ऊसतोड मजुरांना एकही ऊसतोड मजूर कारखान्यावर जाणार नाही, अशी ठाम भूमिका या संघटनेनं घेतल्याचे सांगितले. ’राज्यातील सर्वात मोठ्या स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक कामगार संघटना व इतर संघटना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोयता म्यानचा एल्गार केला तसेच, ऊसतोड मजुरांचा संप फोडयाचा प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरून आणखी तीव्र करू’, असा इशारा दिला. ’जोपर्यंत घामाला दाम मिळत नाही तोपर्यंत एकही कोयता फळात जाणार नाही. असा निर्धार करत ऊसतोड मजुरांच्या हितासाठीच हा संप करत असल्याचे ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले घामाला दाम मिळेपर्यंत कोयता म्यान राहणार’, असं संघटनेचे पदाधिकारी विष्णु जायभाये यांनी सांगितले.