बीड

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; जम्मू काश्मीर च्या प्रभारी पदी रजनीताई पाटील

बीड, दि.12 सप्टेंबर :- कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा.सोनियाजी गांधी यांनी आज CWC (काँग्रेस वर्किंग कमिटी) ची घोषणा केली यामध्ये काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या मा.खा. रजनीताई पाटील यांची वर्णी लागली आहे. त्याच बरोबर त्यांना जम्मू & काश्मीर च्या प्रभारी पदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय व सर्व जिल्हावाशीयांच्या वतीने ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन होत आहे.
लेटरबॉम्बचे कर्तेधर्ते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांना सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे. तर महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. अजय माकन आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याकडे महासचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यात अंबिका सोनी, मोतीलाल व्होरा आणि लुझेनियो फॅरेरियो यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुकुल वासनिक यांना महासचिव बनवून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने नव्या राज्य प्रभारींच्या नियुत्तäयाही जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राच्या रजनी पाटील यांना जम्मू-कश्मीर तर राजीव सातव यांना गुजरात, दादर नगर हवेली, दीव दमणचे प्रभारी बनवण्यात आले आहे तर महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रभारीपदी एच. के. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!