बीड : आज जिल्हाभरातून तब्बल 126 रुग्ण कोरोनामुक्त होऊन ते घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 76, आष्टी 8, पाटोदा 1, गेवराई 6, माजलगाव 2, वडवणी 3, धारूर 3, केज 3, अंबाजोगाई 7 आणि परळीतील 17 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4626 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, 3408 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत, 129 मयत तर सध्या 1089 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.















