बीड राजकारण

बारामतीकरांनी दिली माजलगावच्या जावाईला बाजार समितीच्या सभापती पदाची भेट

मुबई बाजार समिती सभापती पद अशोक डक यांच्या वर्णी; चौदा वर्षानंतर मराठवाड्याला संधी


बीड, दि.31(लोकाशा न्यूज) मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी माजलगावचे आशोक डक यांची निवड झाली असुन चौदा वर्षानंतर मराठवाड्याला डक यांच्या रुपाने सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.;
गेल्या पाच महिन्या पासुन रखडलेली सभापती पदाची निवड आज मुंबईत पार पडली. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने सभापती पदाची औपचारिक घोषणा होणे बाकी होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक निवडून आलेले असल्याने सभापती पदावर राष्ट्रवादीचा हक्क होता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशोक डक यांचे नाव चर्चेत होते. ते औरंगाबाद महसुल मधून मुंबई बाजार समितीवर संचालक म्हणून सर्वाधिक मताने निवडून गेले आहेत. अपेक्षे प्रमाणे त्यांची आज सभापती म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीने बीड जिल्ह्याला प्रथमच मुंबई बाजार समितीच्या सभापती पदाचा मान मिळाला आहे. चौदा वर्षांपुर्वी मराठवाड्यातील परभणीचे रामप्रसाद बोर्डीकर यांना संधी मिळाली होती. यामुळे बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!