बीड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. केंद्र शासनाने परिस्थिती नुसार अनलॉक कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणी देशभरात सुरु झाली. देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकाप्रमाणे देशातील अनेक प्रमुख देवस्थाने खुली करण्यात आली महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप या परिपत्रकाची दाखल न घेतल्याने राज्यातील सर्व मंदिरे आजतागायत बंद आहेत. अनेक व्यक्ती व संघटनांनी राज्यसरकार कडे मंदिर खुली करण्याबाबत मागणी केली आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून घालून दिलेले सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन,पूजन,कीर्तन सुरु करण्यात यावेत हि सर्वांची एकमुखी मागणी असताना हि राज्यातील महाविकास आघाडी सरकार मान्य करत नाही. राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विविध धार्मिक संस्था व प्रमुख देवस्थानांच्या वतीने राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचे निश्चित झाले आहे. या घंटानाद आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने संपूर्ण पाठिंबा दिला असून या आंदोलनामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे. अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष, लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच मोर्चे आघाडी प्रमुख व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे. हे आंदोलन 29 ऑगस्ट रोजी एकाचवेळी सकाळी 11 वाजता सुरु होईल. जिल्ह्यातील सर्व मंदिर व संस्थानातील मठाधिपती, प्रमुख व भाविक भक्तांनी आपल्या परिसरातील मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करावे. राज्यात जवळपास बरेच व्यवहार सुरु झाले आहेत एस.टी बससेवा सुरु झाली आहे परंतु खाजगी गाड्यातून प्रवासासाठी ई-पासची अट कायम ठेवली आहे. दारूचीदुकाने,बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. राज्यातील अनलॉकबाबत सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण आहेत. केंद्राच्या अनलॉक परिपत्रकाप्रमाणे राज्यात त्याची अमलबजावणी होत नाही म्हणेल धोरण आणि बांधील तेच तोरण असा तिघाडी सरकारचा बिघाडी कारभार चालू आहे. तिघाडी सरकारच्या विसंगत व बेजबाबदार धोरणामुळे राज्यातील मंदिर परवाना अडकला आहे. मंदिर हा जनतेच्या संस्थेचा विषय असून मंदिरावरती मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाह मंदिर अर्थव्यवस्थेवर चालतात. राज्यात दारूची दुकाने उघडी आहेत परंतु भाविकांना मंदिरात जाण्यास मज्जाव आहे. अशा विचित्र धोरणाचे निर्णय घेतल्याने जनतेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. मंदिर परवान्यामुळे अडकलेली अर्थव्यवस्था मुक्त व सुरळीत झाली पाहिजे भाविक भक्तांना देवदर्शनासाठी मंदिरे खुली झाली पाहिजेत या मागणीसाठी ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक देत राज्यभर घंटानाद आंदोलन विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.