बीड जिल्ह्यातील नगरपालिकांची मतदान प्रक्रिया तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे, या अनुषंगानेच सर्वच पक्षीय नेत्यांची सध्या प्रचारासाठी धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत, त्यांची पहिली सभा धारूर येथे, दुसरी सभा माजलगाव येथे, तिसरी सभा बीडमध्ये तर 4 सभा गेवराई मध्ये होणार आहे या सभेचे अनुषंगाने ते बीडमध्ये येणार असल्याने शहरातील ग्रँड यशोदा या ठिकाणी ते वकील आणि इंजिनिअर यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत, पवार दिवसभर उद्या बीडमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सध्या चांगलीच धावपळ पाहायला मिळत आहे















