बीड, बीड जिल्ह्यात शिक्षकांची बोगस भरती केल्याप्रकरणी शासनाने बीड झेडपीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या दोघांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे, फुलारी यांच्या निलंबनामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त झाले आहे, त्यामुळे आता या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, याबाबत बीड झेडपीचे सीईओ विलास जाधव यांनी त्यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपवली आहे.















