बीड

जबरी चोरी करणारा आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

मागील दिड महिन्याखाली पाचेगाव परीसरात शेतामध्ये वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटंबीयास अज्ञात चोरटयाने त्याचे गळयातील सोन्याचे दागोणे बळजबरीने हिसकावून घेवुन पळुन गेले होते त्यावरुन पोलीस ठाणे गेवराई येथे गु.र.नं 500/2025 कलम 304,309 (4), 3(5) बी. एन. एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहीती काटुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते.

दिनांक 11.10.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बोराडे फारम भोसले व त्याचे साथीदाराने सदरील शेतकरी कुटुंबीयास लुटले असुन तो सध्या गेवराई येथे जातेगांव फाट्यावर थांबलेला आहे. लागलीच पथक रवाना होवून त्यास पकडले व त्याचे कडे गुन्हयामध्ये चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल गळयातील सोन्याची कंटी व डोरले मिळुन आला. त्याचे कडे मिळून आलेल्या सोन्या बाबत चौकशी करता त्याने सदरील सोने पाचेगांव शिवारातुन वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांचे लुटले असल्याचे कबुल केले आहे.

वरील गुन्हयात एक आरोपी निष्पन्न झाला आहे, आरोपी व मुद्देमाल पुढील गुन्हयाचा तपास कामी पोलीस हवालदार पिंपळे पोलीस ठाणे गेवराई यांचे ताब्यात देण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी यश आले आहे.

सदरील कामगिरी श्री नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बौड़, श्री शिवाजी बटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, अंकुश वरपे, राहुल शीद, दिपक खांडेकर, आश्पाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळून केली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!