बीड

बीड जिल्ह्यातील सहाव्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची घडकेबाज कारवाई

बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MCOCA व MPDA अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत.

पो.स्टे. नेकनुर गुरनं 117/2025 कलम 310(2) भान्यासं या गुन्हयांचे फिर्यादी नामे संजय बाळासाहेब गित्ते वय 30 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, वॉचमन/सुपरवायझर रा. मंझरीघाट ता. पाटोदा जि. बीड यांनी दिनांक 23.05.2025 रोजी पो.स्टे. नेकनुर येथे फिर्याद दिली की, ते दिनांक, 23/05/2025 रोजी रात्री 01.00 वा.सु. कर्तव्यावर असंताना व पेट्रोलिंग करत असतांना लिंबागणेश गावचे शिवारातील ओटू पावर कंपणीची पवनचक्की क्र. 39 वर 12 ते 14 चोरट्यांनी कुलुप तोडून पवनचक्कीला जोडलेले कॉपर वायरचे एकुण 23 वायर चोरी करण्याच्या उद्देशाने तोडून 17,75,723/- रु चे नुकसान केले त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर इसमांना असे करु नका असे का करता असे म्हणाले असता आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचेवर कोयता व लोंखडी रॉड हातात घेऊन हवेत फिरवुन चाल केली असता यातील साक्षीदार वॉचमन यांनी परवाना धारक पिस्टल मधुन दोन राऊंड फायर केले असता त्यात एक आरोपी नामे राजु विष्णु काळे रा. तुळजापुर जि. धाराशिव हा मरण पावला वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन व पुरवणी जवाबा वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांचा प्रथम तपास पोउपनि रोकडे व त्यांनतर सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी केला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात नेकनुर/स्थागुशा पोलीसांनी आरोपींचा बारकाईने शोध घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1. सुभाष भास्कर काळे वय 44 वर्षे रा. अंधोरा ता. कळंब जि. धाराशिव (टोळी प्रमुख) 2. बाबुशा भिमराव काळे वय 25 वर्षे रा. अंधोरा ता. कळंब जि. धाराशिव 3. रामा ऊर्फ बिल्या शंकर काळे वय 22 वर्षे रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव आरोपी क्र.1 व 2 यांना दिनांक 07.07.2025 रोजी व आरोपी क्र.3 यास 18.07.2025 रोजी अटक केली व त्यांची PCR घेऊन तपास केला आहे. तसेच गुन्हयांत इतर 04 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यापैकी 01 मयत व 3 फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासा दरम्यान अटकेतील आरोपीतांकडून 4,50,000/- रु किंमतीची टाटा सुमो गाडी MH42A5753 ही

जप्त करण्यात आली आहे. सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या अहिल्यानगर, सोलापुर, बीड व धाराशिव जिल्हयात एकुण 11 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात दरोडा टाकणे, दरोडयाचा प्रयत्न करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, अवैधशस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत. प्रस्तावात एकुण 11 गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 10 गुन्हयांची दखल मा. न्यायालयाने घेतलेली असुन 01 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असुन 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत. सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आर्थीक फायदयासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतुन लपुन राहीले नाही. त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी सपोनि चंद्रकांत गोसावी पो.स्टे. नेकनुर यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व स. पोलीस अधिक्षक केज यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 02/10/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता, पोलीस अधिक्षक, श्री नवनीत कॉवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन सदर प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.

मा. श्री. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 10/10/2025 रोजी नमूद संदर्भीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. व्यकंटराम, सहायक पोलीस अधीक्षक केज यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1) (ii), 3(2),3 (4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन सहायक पोलीस अधीक्षक केज हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत 03 आरोपी अटक असुन 03 निष्पन्न आरोपी फरार व 01 मयत आहे. पोलीस फरार आरोपीतांच्या शोधात आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक केज श्री. व्यंकटराम, पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री चंद्रकांत गोसावी, पोउपनि रोकडे, पोअं/संजय गुंड, आश्रुबा मुरकुटे, सुधाकर जायभाये सर्व पो. स्टे. नेकनुर तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, गोविंद राख, बिभीषण चव्हाण स्थागुशा बीड यांनी केली आहे. भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द तसेच बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!