बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : बीडच्या डीवायएसपी पदी पुजा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी बीडमध्ये प्रशिक्षणार्थी डीवायएसपी म्हणून कर्तव्य बजावलेले आहे आता त्यांना बीडमध्येच गृहविभागाने नियुक्ती दिली आहे.
विश्वांबर गोल्डे हे बीड डीवायएसपी म्हणून कर्तव्य बजावत होते. मात्र ते पोलिस सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. बदल्या करूनही बीडमध्ये येण्यास अधिकारी तयार नाहीत, त्यामुळे बीड डीवायएसपी पदाचा अतिरिक्त पदभार आष्टीचे डीवायएसपी हानपुडे यांच्याकडे देण्यात आला होता. आता बीड डीवायएसपी म्हणून पुजा पवार यांची गृह विभागाने नियुक्ती केली आहे. यासंदर्भात गुरूवारी आदेश काढण्यात आला आहे. यापुर्वी पुजा पवार यांनी प्रशिक्षणार्थी डीवायएसपी म्हणून कर्तव्यदक्षपणे काम केलेले आहे. त्यामुळेच आता त्यांच्या या नियुक्तीने बीड विभागातील पोलिस खात्याच्या कामाला गती मिळणार आहे.