बीड

बीडमधील विद्यार्थिनीच्या छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी जिल्ह्यात दाखल, आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू

बीड, उमाकिरण या खाजगी क्लासेस संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाला होता, या घटनेने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती, संस्थेचा प्रमुख विजय पवार आणि प्रा.प्रशांत खाटोकर सध्या याप्रकरणी जेलमध्ये आहेत, या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली होती, त्यानुसार एसआयटीचे दहा सदस्य पथक बीडमध्ये दाखल झाले आहे, आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक बीडच्या या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी करत आहे या चौकशीतून नेमके काय काय बाहेर येते याकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष असणार आहे, विशेष म्हणजे या पथकात छत्रपती संभाजी नगर,धाराशिव आणि जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळेच या प्रकरणाचा एसआयटीकडून अत्यंत प्रभावीपणे आणि निपक्षपणे तपास होणार आहे. विशेष म्हणजे आरोपी विजय पवारवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्याही प्रकरणाची चौकशी एसआयटी कडून केली जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!