बीड

शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यात, जिल्ह्याचा चेहरा बदलायचा असेल तर शिक्षण महत्वाचे – विवेक जॉन्सन, कारेगव्हाणच्या शाळेत उपस्थित राहून कलेक्टरांनी केले विद्यार्थ्याचे स्वागत, बालविवाह मुक्तीची शपथ देवून केले वृक्षारोपण


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगव्हाण येथे प्रवेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, श्रशिक्षण विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, जिल्हा समन्वयक संजय मोरे, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्याचा चेहरा बदलायचा असेल तर शिक्षण महत्वाचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांचा सहभाग उल्लेखनीय होता. या वेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी गेल्या दोन वर्षांपासून कारेगव्हाण येथे एकही बालविवाह न झाल्याचे कौतुक करत, बीड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी’ शपथ दिली. त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन करत गावकर्‍यांच्या सहकार्याची प्रशंसा केली. शेवटी शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वगत केले मुख्याध्यापक विकास परदेशी, सहशिक्षक जोगदंड,  आणि सहकार्‍यांनी केले होते. गावात शिक्षण, बालविवाहमुक्ती आणि पर्यावरण यावर सजगतेचा संदेश गेला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करणार
बीड जिल्ह्यातील शिक्षणातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याच प्रयत्नातून जिल्ह्यात आदर्श शाळा घडविण्याचेही कामही केले जाणार असल्याचा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी माध्यमांशी बोलून दाखविला आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!