बीड

मानलं रे पट्ट्या, बीडच्या अविनाश साबळेची सुवर्ण कामगिरी, भारताने तब्बल 36 वर्षानंतर स्टीपलचेसमध्ये जिंकलं गोल्ड मेडल

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा ता. आष्टी गावात जन्मलेला धावपटू अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तब्बल 36 वर्षांनंतर भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने अंतिम फेरीत 8:20.92 सेंकदाची वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अविनाश या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1975 साली हरबैल सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये दिना राम यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!