बीड

गुंडगिरी करणार्‍यांना कलेक्टर, एसपींचा दणका ! बीड जिल्ह्यातील चार गुंडांवर एकाच दिवशी एमपीडीएची कारवाई करून हर्सूलच्या कारागृहात पाठविले


बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात गुंडगिरी करणार्‍यांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे माफी नाहीच. त्यामुळे अशा गुंडांना त्या दोघांनीही मोठा दणका दिला आहे. बीड जिल्ह्यातील चार गुंडांना एकाच दिवशी एमपीडीएची कारवाई करून त्यांना हर्सूलच्या कारागृहात पाठविले आहे. कलेक्टर, एसपींनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळल्यापासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत, त्यांना बीड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून एमपीडीए व मोक्का कायद्या अंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंघाने पोलीस अधीक्षकांच्या सुचनेवरून प्रभारी अधिकारी पो.नि. पो.स्टे. माजलगाव शहर यांनी दि. 1 एप्रिल 2025 रोजी तारेख खान मुसा खान (वय 28 वर्षे रा. फुलेनगर, माजलगाव (धोकादायक व्यक्ती), स.पो.नि. पो.स्टे. वडवणी यांनी दि. 18 मार्च 2025 रोजी विशाल माणिक डांबे (वय 24 वर्षे रा. बाहेगव्हाण ता. वडवणी (धोकादायक व्यक्ती), पो.नि. पो.स्टे. अंबाजोगाई ग्रामीण यांनी दि. 6 मार्च 2025 रोजी गजाजन सुभाष जाधव (वय 38 वर्षे रा. राडी तांडा ता. अंबाजोगाई (बुटलेगर) आणि पो.नि.पो.स्टे. शिवाजीनगर यांनी दि. 9 एप्रिल 2025 रोजी गणेश भारत गिरी (वय 23 वर्षे रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नगर रोड, बीड (धोकादायक व्यक्ती) यांच्या विरुध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकार्‍यांना सादर केला होता. सदर स्थानबध्द इसम क्रमांक । याचे विरुध्द पो.स्टे. माजलगांव शहर येथे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, रस्ता आडबुण मारहाण करणे, चोरी करणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 08 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे याकरिता त्याच्यावर बीएनएसएस 126 प्रमाणे यापूर्वीच प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तसेच उपविभागीय दंडाधिकारी माजलगांव यांनी सदर इसमास यापूर्वी कलम 56(1) मपोका प्रमाणे तडीपार केले होते. सदर स्थानबध्द इसम क्रमांक 2 याचे विरुध्द पो.स्टे. वडवणी येथे मारहाण करणे, मुलींची छेडछाड करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गैर कायद्याची मंडळी जमविणे, जबरी चोरी करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 15 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे, सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याच्या सीआरपीसी 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती व पोलीस अधीक्षक बीड यांनी यापुर्वी सदर इसमास कलम 55 मपोका प्रमाणे 01 वर्षा करीता बीड जिल्हयाच्या हद्दीतुन हद्दपार केले होते. सदर स्थानबध्द इसम क्रमांक 3 वाचे विरुध्द पो.स्टे. अंबाजोगाई ग्रामीण येथे हातभट्टीची दारु तयार करणे, वाहतुक करणे, ताब्यात बाळगणे, बेकायदेशीररीत्या हातभट्टीच्या दारुची विक्री करणे, या व अशा स्वरुपाचे एकुण 05 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याच्यावर म.दा.का. चे कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. सदर स्थानबध्द इसम क्रमांक 4 याचे विरुध्द पो.स्टे. शिवाजीनगर, बीड शहरात खंडणी मागणे, वाहनांची तोडफोड करुन नुकसान करणे, जाळपोळ करणे, दुखापत करण्याच्या उद्देशाने मारहाण करणे, रस्ता आडविणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन दुखापत करणे, धार्मीक भावना दुखावने, जातीवाचक शिवीगाळ करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 04 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याच्यावर सीआरपीसी 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. सदरील चार ही इसम हे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे तसेच हातभट्टी दारु विषयक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवईचे असल्याने पोलीसांची त्यांच्यावर बर्‍याच दिवसांपासुन करडी नजर होती. तसेच सदर चार ही इसमांनी आपले बर्तन सुधारावे म्हणुन यापुर्वी त्यांचेवर कलम 55, 56(1) मपोका, सीपीसी 110, 126, बीएनएसएस 93 मदाका प्रमाणे वेळोवेळी त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हे प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवुन होते, त्यांची माजलगावं, वडवणी, अंबजोगाई व बीड शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत, ते सर्वसामान्य लोकांना व व्यापार्‍यांना त्रास देवून दहशत निर्माण करुन गुन्हे करत होते. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दि. 11 मे 2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदाक्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर चार ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृहात हजर करून स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केले होते, त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना संबधित पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो. नि. स्थागुशा यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर इसमा पैकी अनु क्र. 1 व 3 यांना दि. 11 मे 2025 रोजी ताब्यात घेऊन संबंधीत पो.स्टे.ला हजर केले. संबंधीत पो.स्टे. ने नमूद इसमांना हार्सल कारगृह येथे हजर केले आहे. अनु क्रमांक 2 यास दि. 12.05.2025 रोजी पुणे येथुन स्थागुशा ने ताब्यात घेऊन पो.स्टे. वडवणी येथे हजर करून स्थानचध्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनु क्र.4 हा सध्या बीड न्यायालयीन कोठडीत असुन पुढील कारवाई करण्याचे योजीले आहे. यातील सर्व प्रस्तावित स्थानबध्द इसम हे स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी पकडलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (भापोसे), अपोअ बीड श्री. सचिन पांडकर, अपोअ अंचाजोगाई श्रीमती चेतना तिडके, उपविपोअ श्री. अनिल चोरमले, श्री विश्वांभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री उस्मान शेख स्थागुशा बीड, शिवाजी घंटेवाड, पो.नि. मारुती खेडकर, पो.नि. राहुल सुर्यतळ, पो.नि. श्री. संतोष घोडके व स.पो.नि. अमन शिरसठ, सपोनि रंगनाथ जगताप, पोउपनि केरबा माखने, पोह कल्याण देशमाने, किसन घोळवे, जगजीवन करवंदे, अरुण राऊत, शुभम राऊत, माधव तोटेवाड, विलास खरात, परझने, कांदे, स्थागुशाचे पोउपनि श्री. श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, महेश विघ्ने, तुळशिराम जगताप, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोह अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, जफर पठाण, बाळकृष्ण जायभाये, कैलास ठोंबरे, महेश जोगदंड, गणेश मराडे, पोअं/अर्जुन यादव, मांजरे, बप्पासाहेब घोडके, चालक खवतड नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वालुवा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणार्‍या, खंडणी बहाद्दर घोकादायक गुंडावर जास्तीत जास्त चझऊ व चउजउ कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!