बीड

देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नागरिकांनी जागरुक राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये- पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांचे आवाहन


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : पाकीस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी केलेल्या भ्याड हल्याचा भारताने निषेध केला आहे, पाकीस्तान मधील नागरी वस्तीची सुरक्षीतता अवाधीत ठेवून ऑपरेशन सिंदुर राबविले आहे. त्यामध्ये दहशतवादी तळ उधवस्त केले आहेत, त्यामुळे पाकिस्तान सिमावर्ती भागात हल्ले करत आहे. भारताकडून त्यांचे सर्व हल्ले सक्षमपणे हाणून पाडण्यात भारतास यश येत आहे. परंतु तरीसुध्दा पाकिस्तानकडुन भारतामध्ये काही अफवां पसरवुन गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मिडीया हॅक करुन खोट्या अफवा पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, या अनुषंगाने सर्व नागरीकांना बीड पोलीस दलातर्फे अहवान करण्यात आले आहे. भारत एक संघ आहे, सर्वांना भारत एकसंघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्याचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवु नका, कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकिय स्त्रोतांकडुनच स्विकारा, सोशल मिडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करु नका अफवा पसरवणे कायद्याने दंडनीय आहे, सोशल मिडियाचा वापर करताना अनोळखी, संशयास्पद लिंकवर क्लीक करु नये, सोशल मिडीयाची काळजीपुर्वक हाताळणी करावी, लष्करी, निमलष्करी दलाच्या हालचालीबाबत काहीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सोशल मिडियावर व इतरत्र माहिती प्रसारीत करु नये, स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा, शाळा, कार्यालये, वाहतुक याबाबत बदल झाल्यास प्रशासन माहिती देईल, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा, नागरीकांना जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न करावेत, कोणतीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये, भारत एक मजबूत आणि सजग देश आहे. नागरीकांनी शांतता राखावी, संयम बाळगावा आणि देशाच्या सुरक्षेसाठी जागरुक राहावे, गरज पडल्यास बीड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील 02442-222333 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!