
धारूर,
आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव ता. धारूर जि.बीड येथे ध्वजारोहन उत्साहात झाले. त्यांनतर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” वाटचाल द्रष्यमान शाशवत स्वच्छतेकडे….. अभियान अंतर्गत दि. 1 मे 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधी मध्ये आज या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव येथे गट विकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सहायक गट विकास अधिकारी श्री कांदे साहेब विस्तार अधिकारी श्री माने साहेब, पाळेकर साहेब कुलकर्णी साहेब तसेच संजय कांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कचरा संकलन करून कंपोस्ट खड्डा भरून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आदर्श गाव आवरगावचे सरपंच अमोलजी जगताप ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब झोंबाडे सद्यक्ष राहुल नखाते, चंद्रकला लोखंडे, बालाजी नखाते, कुसुम जगताप, स्वाती मनोज नखाते तसेच माजी सरपंच सौ. पद्मिनबाई जगताप मुख्याध्यापक श्री फरके सर भगवान नखाते सुरेंद्र नखाते पुस्पराज जगताप सुनील लोखंडे अंकुश जगताप धोंडीराम नखाते उत्तम लोखंडे कल्याण नखाते विनोद नखाते दिलीप नखाते भारत सुरवसे सुंदर नखाते कमलकिशोर जगताप तसेच ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.