बीड

लोकाभिमूख व गतिमान अभियान राबवावे, 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांचे आवाहन

         बीड, दि. 29 (जि.मा.का.) 100 दिवसाच्या कार्यक्रमात जिल्हयातील प्रत्येक अधिका-यांनी नाविण्यपूर्ण,लोकाभिमूख, गतीमान अभियान राबवून स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेचा दुस-या टप्यातील कार्यालयाचा मुल्यामापन अहवाल आढावा व्ही.सी व्दारे घेण्यात आला. या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
   यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,आदित्य जिवने, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासनाचे) शैलेस सुर्यवंशी तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
         याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की, बीड जिल्हयामध्ये कार्यालयीन स्वच्छतेचा अभाव आढळून आला असून कार्यालयीन स्वच्छता हा पाया असून स्वच्छतेला प्रथम प्राधान्य द्यावे तसेच ही स्वच्छता केवळ अभियानापुरतीच मर्यादित न ठेवता कायम स्वरुपी ठेवावी. 
  100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेत कार्यालयाचा कायापालट, शौचालय, पिण्याचे पाणी, कार्यालयीन स्वच्छता, कर्मचा-यांच्या टेबलवर नेम प्लेट, थम मशीन या सुधारणेला गतिमानता मिळावी. नागरिकांसोबत व्यवहार करतांना संवेदनशिलपणे करावा. 
      कार्यालय प्रमुखास काही अडचणी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधवा, प्रंलबित विषयी लवकरात लवकर सोडवावे यासंदर्भात अडचणी असेल तर टिपणी टाकावी किंवा ते काम का प्रलंबित आहे ते मुद्दे माझ्या निदर्शनास आणून द्यावेत.
 आपणास निधीची कमतरता असेल तर  डिपीसीतून निधीची मागणी करावी, निधीची उपलब्धता करून दिली जाईल. 100 दिवसाची  कार्यालयीन मोहिम दुस-या टप्यातील कामाची पीपीटी 2 मे 2025 पर्यंत कार्यालय प्रमुखाने सादर करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. 
   आपल्या काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर त्याही मांडाव्यात त्याचा जरुर विचार केला जाईल, जेणे करुन कार्यालये आणि सोबतच जिल्हयातील स्वच्छतेचाही प्रश्न सुटेल.  असे ते म्हणाले
                                                           ******

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!