बीड

तहसील कार्यालयात केवायसीसाठी आलेल्या संजय गांधी लाभार्थी महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, तहसीलदारांची उडवा उडवीची उत्तरे


प्रतिनिधी । धारूर
तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी केवायसी करण्यासाठी आलेल्या लाभार्थी वृद्ध महिलेचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
तहसील कार्यालयाच्या तळमजल्यातील कोंडवाड्यात केवायसी करण्यात येत होती .यावेळी २०० च्या जवळपास लाभार्थ्यांची गर्दी झाली होती .गर्दीमध्ये गुदमरून महिलेचा मृत्यू झाला .कमलबाई बाबुराव कसबे वय ७० वर्षे असे मयत महिलेचे नाव आहे .

तालुक्यातील जहागीरमोहा येथील कमलबाई बाबुराव कसबे या संजय गांधी योजनेतील लाभार्थी आहेत .शासनाच्या नियमानुसार महाडीबीटीवर लाभ मिळण्यासाठीपैसे केवायसी करणे बंधन करण्यात आले आहे .या केवायसी साठी मागील दोन ते तीन महिन्यापासून लाभार्थी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत .लाभार्थ्यांचे केवायसी करण्याचे काम तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात ठेवण्यात आले आहे .हा तळमजला कमी उंचीचा असून येथे कसल्याही प्रकारची हवा मिळत नाही .येथे फॅन्सी ही व्यवस्था करण्यात आलेली नाही .या मजल्यासाठी तीन दरवाजे व काही खिडक्या आहेत .त्या नेहमीच बंद असतात . येथे फॅम ची सुविधा नसल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात येथे उष्माघाताचा प्रकार होऊ शकतो .गुरुवारी सकाळी कमलाबाई कसबे या बसने धारूर येथे आल्या होत्या .बस स्थानकापासून चालत तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचल्या .यावेळी येथे तळमजल्याचा दरवाजा उघडण्यासाठी कर्मचारी जयस खरात नावाचे कर्मचारी आले .दरवाजा उघडल्यानंतर इथे २०० च्या जवळपास लाभार्थ्यांची तुंबळ गर्दी झाली .या गर्दीमध्ये कमलबाई कसबे सापडल्या .गर्दीमध्ये उष्माघात झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती .बाहेर येऊन झाडाखाली काही वेळ बसल्या होत्या .परंतु त्यांना जास्त चक्कर आल्यामुळे ग्रामीण रुग्णालय धारूर येथे हलवण्यात आले .परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत जाहीर केले .या ठिकाणी कमलबाई यांना लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तळमज्यातील कोंडवाड्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा तहसील कार्यालयात दिवसभर होती .याबाबत तहसील प्रशासन मात्र कसले प्रकारची काळजी घेताना दिसत नाही .तहसीलदार श्रीकांत निळे यांना या लाभार्थ्यांची कसले प्रकारे देणे घेणे नसल्याची दिसून येत असून ही अनेक वेळा तक्रारी करूनही लाभार्थ्यांची काळजी घेत नाहीत .तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याशी संपर्क साधला असता तहसील कार्यालयात काही तसे झालेच नसल्याचे सांगत उडवा-उडीची उत्तरे त्यांच्याकडून देण्यात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.


  • फॅनची सुविधा नाही
    तहसील कार्यालयाच्या तळमजल्यामध्ये केवायसी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे .गुरुवारी सकाळी शंभर महिला तर १५० पुरुष लाभार्थ्यांची गर्दी अचानक झाली होती .एक दरवाजा उघडल्यानंतर तुंबड झाली होती .यामध्ये कमलबाई कसबे या महिलेला चक्कर आली होती या हॉलमध्ये कसलेही प्रकारचा हवा येण्यासाठी फॅन बसवण्यात आलेला नाही.
  • जयस खरात, कर्मचारी तहसील कार्यालय

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!