बीड :- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या नव्वद दिवसापासून सुरु असलेल्या आरोपांनंतर मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या कडील मंत्रीपद माजी मंत्री छगन भुजबळ किंवा माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.