बीड

ना. पंकजाताई मुंडे यांचे परळीला नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट ; पशुवैद्यकीय महाविद्यालयास मिळाली कॅबिनेटची मंजूरी, ५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस राज्य सरकारची मान्यता

मुंबई।दिनांक २५।
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघाला महाशिवरात्री व नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट दिलं आहे. परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिला असून यासाठी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस मंजूरी दिली आहे.

ना. पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी जिल्ह्यात परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आपल्या विकासाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या टीमने ९ फेब्रुवारी रोजी परळी शहरातील मेरू पर्वतावर आणि लोणी येथे यासाठी जागेची पाहणी केली होती व तसा अहवाल शासनाकडे सादर केला होता. महाविद्यालय स्थापन होण्याकरिता लागणाऱ्या मुलभूत सोयी सुविधा, पाण्याची उपलब्धता तसेच इतर आवश्यक बाबी या दोन्ही ठिकाणी सहजपणे उपलब्ध असल्याने महाविद्यालय स्थापन करण्याकरिता कसलीही अडचण येणार नाही असे संबधित अधिकाऱ्यांनी शासनाला कळवले होते.

कॅबिनेटची मंजूरी अन् तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उप मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली, त्यासाठी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!