नांदूरघाट, दि. 17 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील नांदूरघाटमध्ये तब्बल एक किलो सोने सापडले आहे. तामिळनाडू पोलिसांनी सोमवारी सकाळी सोन्याचे दुकानदार अनिल बडे यांच्या घरावर छापेमारी केली आहे. पोलिस आल्याचे दिसताच बडे घराच्या छतावरून उडी मारून फरार झाले आहेत. चोरट्यांनी दरोड्यातील एक किलो 200 ग्रॉम सोने बडेंना विक्री केले होते. या सोन्याची किंमत एक कोटींच्या घरात आहे. बडेंनी चोरट्यांसोबत 25 लाख रूपयांची डिल केली होती. त्यापैकी चौदा लाख रूपये चोरट्यांना दिले होते. उर्वरित 11 लाख रूपये देणे बाकी होते. मात्र सदर चोरट्यांनी पकडून तामिळनाडू पोलिसांनी बडेंच्या घरावर छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे नांदूरघाटसह संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या छापेमारी दरम्यान तामिळनाडू पोलिसांसह केजचे पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूर घाट चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे, शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. मागच्या दोन दिवसांपासून तामिळनाडू पोलिस पकडलेल्या चोरट्यांना घेवून नांदूरघाटमध्ये तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे ते गाडीला खोटा नंबर लावून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.