बीड, दि.10 ():- माजलगाव तालुक्यातील मोगरा शिवाजीनगर तांडा येथील जुन्या पिढीतील पुतळाबाई सोमा राठोड (वय- 103 वर्षे) यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी दि.10 फेब्रुवारी रोजी दुपारी देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली,सुना,नातू नातवंडे अस मोठा परिवार असून त्यांचा अंत्यसंस्कार मोगरा येथे सायंकाळी 5 वाजता शिवाजी नगर तांडा येथे होणार आहे.