बीड दि. ०४ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आष्टी येथे येत असून त्यांच्यासमवेत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे देखील उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने आणि मुख्यमंत्र्यांचे जिल्हयात आगमन होणार असल्याने त्या उपस्थित राहणार आहेत.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन क्रमांक तीन शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलावाच्या पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११.३० वा. संपन्न होत आहे.
••••