बीड

सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा, ना. पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई ।दिनांक ०१।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, शेतमजूर, तरूण वर्ग, महिला अशा सर्व समावेशक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्व सामान्य घटकांना न्याय देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारताचा नवा नकाशा समोर ठेवणारा आहे अशी शब्दांत राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचे पॅकेज, किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता 3 लाखांवरून 5 लाख रूपये करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे. सर्व जिल्हयामध्ये जिल्हा रूग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर, 36 जीवरक्षक औषधी करमुक्त, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज आदींसाठी यात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणे, सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत भावना उंचावणे आणि वाढत्या मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवणे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे ना. पंकजाताई यांनी सांगितले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!